नरडाणा येथील सिसोदे महाविद्यालयात संविधान दिवस साजरा.
✍️ संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा
नरडाणा:, ग्रामिण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भाऊसाहेब कै. एम. डी. सिसोदे कला, वाणिज्य, सौ. उषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान महाविद्यालय व श्रीमती आर. एम. सिसोदे कनिष्ठ कला महाविदयालयात विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे भारतीय संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान उद्देशिकाचे प्राचार्य डॉ.पी.एस. गिरासे व प्रा. डॉ. राजू गिरधर पवार जे. पी. वळवी वरिष्ठ महाविद्यालय धडगाव यांच्या हस्ते पूजन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. गिरासे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान निर्मितीसाठी दिलेले सर्वोच्च योगदान, लोकशाही मूल्य, धर्मनिरपेक्ष, संघराज्य प्रणाली, नागरिकांचे मुलभूत हक्क, बंधूभाव, समता व मानवतावादी विचारांना उजाळा देऊन उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एन. के. पाटील, उपप्राचार्य प्रा.एस. टी. भामरे, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. सारीका पाटील, प्रा.सोनाली शिंदे, प्रा. गिरिष पवार,प्रा. आर. एस. जाधव, प्रा.योगेश्वरी सावंत, प्रा. हर्षा पाटील, प्रा. रोहोणी सिसोदे, प्रा.शिवानी लोहार, आर. ओ. पाटील, दिनेश बोरसे, प्रशांत सिसोदे, संदीप निकम, संजय बोरसे, शशीकांत भामरे, शंकर सिसोदे व फारुक कुरेशी यांनी परीश्रम घेतले.















