नरडाणा येथील सिसोदे कनिष्ठ महाविद्यालयात सेवा पंधरवडानिमित्त आरोग्य तपासणी
✍️ शिंदखेडा माझा( संपादक यादवराव सावंत) :-
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत दि.19 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामिण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रीमती. आर. एम. सिसोदे कला कनिष्ठ महाविद्यालय येथे “राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम” अंतर्गत इयत्ता अकरावी व बारावीच्या एकूण 99 विद्यार्थी विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिंदखेडा तालुका वैद्यकीय पथकात डॉ. उज्वल पाटील, डॉ. अंजली पवार, परिचारिका विजया चव्हाण, औषध निर्माता मीर्झा अन्सारी यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासनी केली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे चेअरमन बाबासो श्री. संजय सिसोदे व प्राचार्य डॉ पी. एस. गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एस. टी.भामरे, उपशिक्षक श्री. टी. एस. भामरे, श्री. पी. जी. पाटील, श्रीमती. एस. बी. महाजन, श्रीमती. के. एस. कढरे यांनी परिश्रम घेतले















