जनगणना 2027 प्रगणक व पर्यवेक्षक विशेष प्रशिक्षणाला सुरुवात. 👉शिंदखेडा नगरपंचायत येथे तीन दिवशीय प्रशिक्षण
शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत ) :-

शिंदखेडा शहर नगरपंचायत हद्दीतील 2027 जनगणने करिता, प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या प्रशिक्षणाला दिनांक 27 एप्रिल पासून सुरुवात झाली. सदर प्रशिक्षण दिनांक 27 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत सकाळी 9.30 ते 5.30 वाजेपर्यंत होणार आहे.
प्रशिक्षणाचे उद्घाटन चार्ज अधिकारी तथा नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांचे हस्ते करण्यात आले.
प्रशिक्षणाची प्रस्तावना विवेक डांगरीकर यांनी सादर केली. तसेच प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यासाठी फिल्ड ट्रेनर म्हणुन शिंदखेडा नगरपंचायतीचे कर निरीक्षक गणेश पवार आणि लेखापरीक्षक शीतल भोज यांची नियुक्ती करण्यात आली असून यांनी पर्यवेक्षक व प्रगणक यांना जनगणना 2027 संबंधित प्रशिक्षण देत आहेत.सदर प्रशिक्षण सकाळ व दुपार या दोन सत्रात आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणास, पर्यवेक्षक सचिन वाघ, दीपलेश बागुल, विपुल साळुंखे दिनेश फुलपगारे, विवेक डांगरीकर, व शहरातील विविध विद्यालयातील 40 शिक्षक प्रगणक , 7 पर्यवेक्षक व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


















