चिमठाणे येथे भव्य मोफत डोळे व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन – मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. ✍️ शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) :-.
शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथे पाच नोव्हेंबर रोजी भव्य मोफत डोळे व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन सदर शिबिर महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असुन जास्तीत जास्त संख्येने चिमठाणे गटातील व परिसरातील सर्व सामान्य नागरिकांनी लाभ घेण्याचे आर्मी दलाचे सेवानिवृत्त सैनिक तरुण नेतृत्व महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी यांनी आवाहन केले आहे. चिमठाणे येथील आर्मी दलातुन नुकतेच सेवानिवृत्त सैनिक, तरुण नेतृत्व सद्या उदयाला आलेले महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी सह त्यांच्या धर्मपत्नी शिक्षित शुभांगी महेंद्र पाटील यांनी आपल्या सामाजिक कार्यातून जनजागृती करत अनेक प्रश्नांना वाचा फोडून जनतेत आपुलकीची भावना रुजवली आहे. देशसेवा करताना सेवानिवृत्तिनंतर आपल्या कर्मभूमीत जनसेवा करावी हया उद्देशाने अनेक सामाजिक कार्य त्यांच्या हातुन घडत आहेत. अनेक समस्या त्यांनी आजपर्यंत सोडविण्यासाठी शासन प्रशासन कडे दाद मागुन यशस्वी ठरलेत. म्हणून स्वाभाविकच जनतेला हवाहवासा वाटणारा तरुण सामाजिक कार्यकर्ते म्हणून चिमठाणे जिल्हा परिषद गटात त्यांना पसंती मिळु लागली आहे. त्यातच त्यांनी सर्व सामान्य, गोरगरीबाच्या हितावह पाच नोव्हेंबर रोजी चिमठाणे येथे भव्य डोळे व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले असुन सदर शिबीर महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे अध्यक्ष स्थानी असणार आहेत. सोबत कृषी उत्पन्न बाजार समिती दोडायचा सभापती भाउसाहेब नारायण पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक बागल, सह चिमठाणे गावासह गण गटातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, तरुण कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभणार असुन सदरील होणाऱ्या भव्य शिबिराला चिमठाणे गण गटातील सर्व सामान्य, गोरगरीबानी लाभ घेण्याचे आवाहन माजी सैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी सह शुभांगी पाटील यांनी केले आहे. सदर शिबीर चिमठाणे येथील डॉ. बाबासाहेब आबेडकर चौक दुध डेअरी येथे सकाळी नऊ वाजेपासून होणार आहे.















