चिमठाणे ते पिंप्री रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाबाबत वारंवार तक्रार कारवाई मात्र शुन्य व संबंधितावर गुन्हे दाखल करा
👉 दहा दिवसात काम न झाल्यास टायर जाळो आंदोलन करणार – महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी

शिंदखेडा माझा पोर्टल (यादवराव सावंत) :-
👉 चिमठाणे ते पिंप्री रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाबाबत व संबंधित अधिकारी/ठेकेदार यांनी आपल्या पत्राची दखल न घेतल्याबाबत तक्रार चिमठाणे येथील महेंद्र पाटील उर्फ सोनू फोजी यांनी केली असुन पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांना देखील प्रत्यक्ष भेटुन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांना सदरील कामावर लक्ष घालावे असे आदेशीत असताना केवळ संबंधित विभागाचे सपसेल दुर्लक्ष केले जात असुन येत्या आठ दिवसात काम न झाल्यास चिमठाणे येथे टायर जाळो आंदोलन करण्याचा इशारा महेंद्र पाटील उर्फ सोनु फौजी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रांमुळे कळवले आहे.
अशी आहे मागणी :-
चिमठाणे ते पिंप्री हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत आपण संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना लेखी पत्र देऊन योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र आपल्या पत्राची कोणतीही गंभीर दखल घेण्यात आलेली नाही. तसेच गेल्या सहा महिन्यात रस्त्याच्या काम कुठल्या प्रकारे झालेले नाही रस्त्याच्या कामात वापरले जाणारे खडी सिमेंट हे चांगल्या कॉलिटी चे नाही व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झीन उडत असून चिमठाणे गावातील नागरिकांना यामुळे अनेक विकार जळन्याची शक्यता असून त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सदर रस्त्याच्या नित्कृष्ठ दर्जाचे काम केल्या प्रकरणी ठेकेदार वर तात्काळ कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच रस्त्याचे काम दुसऱ्या ठेकेदारला देऊन चागल्या पद्धतीने करण्याची मागणी चिमठाणे गावतील नागरिकांनी केली असून तसे न झाल्यास चिमठाणे गावतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित राहून जण अदोलन करणार असून अनेक वेळा प्रशासनाला पत्र देऊन देखील कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहील तसेच बांधकाम विभाग हे ठेकेदाराला पाठीशी घालून सर्वसामान्य नागरिकांना एकप्रकारे मानसिक त्रास देण्याचे काम करत असून चिमठाणे गावातील नागरिकांना आंदोलन करू नये अन्यथा आपल्या वर कार्यवाही करण्यात येईल अशा प्रकारे पत्र देऊन मुस्कटदाबी करण्याचं काम बांधकाम विभाग व ठेकेदार करताना दिसत असून या रस्त्याच्या रुंदी लांबी अतिशय चुकीच्या पद्धतीने घेतली असून कुठल्याही प्रकारचे मोजमाप न करता रस्ता बनवला असल्याची बाब देखील उघडपणे दिसत आहे म्हणून लवकरात लवकर हे काम मार्गी लावा अन्यथा अदोलन करण्यात येणार आहे.
सदर रस्त्यावरील काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून अल्पावधीतच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक, शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी आपल्या आदेशाचे पालन न करता निष्काळजीपणा केला आहे. तसेच मी माहितीचा अधिकारा व्दारे होबार्ड युनिटी योजना अंतर्गत या निकृष्ट रस्त्याची कामाची माहीती मागवली असुन सदर अधिकारी अध्याप मला कुठलीच माहीती दिली नसुन खरोखर संबधीत अधिकारी व ठेकेदार यांनी मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार केला आहे. हे दिसुन येत आहे. तरी यांनी मला लवकरात लवकर माहीती देण्यात यावी. तरी सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी तसेच चिमठाणे ते पिंप्री रस्त्याचे दर्जेदार व कायमस्वरूपी डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा, जर हे काम येत्या दहा दिवसात न झाल्यास चिमठाणे येथील नागरीक व महिला मोठ्या संख्येनी टायर जाळो आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात येणार या प्रकारणात काही अनुसुचित घटना घटल्यास प्रशासन राहिल असे महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांन्वये कळविले आहे.

















