- *शिंदखेडा येथे सुरज देसले युवा मित्र परिवाराच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न दोनशे गुणवंताचा सन्मानपत्र व मेडल देवुन सन्मान* शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- शिंदखेडा शहर व तालुक्यातील दहावी,बारावी,नवोदय,शिष्यवृत्ती, एन. एम. एस. एस. क्रिडास्पर्धेत नाविण्य, डॉक्टर, यासह विविध क्षेत्रात कामगिरी करणारे शालेय विद्यार्थी विद्यार्थीनीचा गुणगौरव सोहळा बिजासनी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेडा पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक हनुमंत गायकवाड होते. तर सेवानिवृत्त कलाशिक्षक नामदेव बैसाणे, रोटट्राक क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. प्रदीप गिरासे, सेवा सोसायटी चे माजी व्हायचेअरमन प्रकाश देसले, संचालक मनिष गोलुबाबा देसले, भाजपा युवा विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले, केद्रप्रमुख कैलास शिंदे,प्रवीण बैसाणे, रमेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार यादवराव सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. जवळपास दोनशे विद्यार्थीचा सन्मानपत्र व मेडल देवुन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक आयोजक युवा नेते सुरज देसले केले. त्यातुन सुरज देसले युवा मित्र मंडळ दरवर्षी शालेय विद्यार्थीचा गौरव करित असते. विद्यार्थीना प्रेरणादायी उपक्रम घेऊन प्रेरित करणे हयामागील उद्देश आहे. अध्यक्षीय भाषणात पी आय गायकवाड यांनी सांगितले कि, विद्यार्थ्यानी केलेल्या कामगिरी चा गौरव हा प्रेरणादायी असुन हयातुन शाबासकी ची थाप सुरज देसले मित्र परिवाराने केल्याबद्दल विशेष आभार मानले. सुत्रसंचालन पत्रकार यादवराव सावंत यांनी तर सुरज देसले यांनी आभार मानले. आयोजक माजी नगरसेवक तथा भायुमो जिल्हाध्यक्ष सुरज देसले,रविंद्र पवार, राजेंद्र चौधरी, तुषार पाटील, सोनू गिरासे, जयेश देसले, कालु सकट, गोपाल सोनार सह युवा मित्र परिवार सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र गिताने तर राष्ट्रगिताने सांगता करण्यात आली. विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












