शिंदखेडा येथे नगराध्यक्षा कलावती माळी यांनी घेतली तातळीची पत्रकार परिषद.
👉 स्थायी समितीच्या दोन सभा तहकुब बाबत खुलासा. 👉 गटातटाचे राजकारण न करता शहराच्या विकासासाठी एकत्र यावे. 👉 शिंदखेडा शहराचा विकास सटविला पुजलेलाच..
✍️शिंदखेडा माझा पोर्टल न्युज (संपादक यादवराव सावंत )
शिंदखेडा येथील नगरपंचायत नगराध्यक्षा कलावती सुकलाल माळी यांनी दि. २७ एप्रिल रोजी तातळीची पत्रकार परिषद घेऊन स्थायी समितीच्या दोन्ही सभा स्थायी समितीचे सदस्यांनी पत्र देवुन तहकुब करण्याबाबत कळविले आहे. त्याबाबत शिंदखेडा शहरातील सुज्ञ नागरिकांना या गोष्टीची माहिती व्हावी म्हणून झालेल्या पत्रकार परिषदेद्वारे खुलासा करताना गटातटाचे राजकारण न करता शिंदखेडा शहराच्या नागरिकांना सोयी सुविधा आपल्याला लवकरात लवकर कशा देता येतील यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे याद्वारे नगराध्यक्षा श्रीमती माळी यांनी आवाहन केले आहे. सदर पत्रकार परिषदेतुन कलावती माळी संबोधित करताना म्हणाल्या कि,शिंदखेडा नगरपंचायतीच्या फंडामधून सन 2026 27 मध्ये नागरिकांसाठी सोयी सुविधा पुरवण्यासाठी जी कामे करावयाचे आहेत त्यांची वार्षिक निविदेची जाहिरात दि. 25 मार्च रोजी मुख्याधिकारी यांनी वृत्तपत्रांमध्ये दिली आहे त्यानुसार काही निविदा आल्या आहेत.यामधून कामाची दर निश्चिती करण्यासाठी स्थायी समितीची पहिली सभा दि. 21 एप्रिल रोजी आयोजित केली होती या अजेंड्यावर विषय अपूर्ण राहिले आहेत असे पत्र देऊन स्थायी समितीच्या सदस्याने सभा तहकुब करण्याबाबत कळवले. त्यानुसार दुसरी सभा दि. 27 एप्रिल रोजी आयोजित केली . या अजेंडा सोबत सर्व कामाच्या निविदांची जाहिरात देखील जोडण्यात आली. मात्र तरी देखील सर्व पाचही सदस्यांनी अजेंड्यावर विषय लिहायला हवेत म्हणून सभा तहकुब करण्याचे पत्र दिले. मी कलावती माळी नगराध्यक्षा या नात्याने या दोन्ही सभांच्या वेळी पूर्ण वेळ हजर होती . शिंदखेडा शहराच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वार्षिक निविदा मंजूर करणे अत्यावश्यक आहे त्यात प्रामुख्याने शहरातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत फिल्टर प्लांटची आतापर्यंत दोन वेळा सफाई करणे आवश्यक होते परंतु योजना सुरू झाल्यापासून एकदाही ती केलेली नाही सध्या मुख्य पाईपलाईन फुटली असून पाण्यात नदीचा गाळ येत आहे पाणीपुरवठा एक दोन दिवस थांबवुन सर्व गाळ काढणे आवश्यक आहे वार्षिक टेंडर मंजूर झाले नाही तर काम होणार नाही शिंदखेडा शहरात विविध ठिकाणी पाईपलाईन लिकेज होते. ती दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करणे गरजेचे असते. वार्षिक टेंडर मंजूर झाल्याशिवाय या कामांवर खर्च करता येणार नाही. सिंदखेड्यात ठिकठिकाणी गटाऱ्याचे ढापे फुटले आहेत काही ठिकाणी गटारीचे नव्याने कामे केली आहेत या कामासाठी वार्षिक निविदा मंजूर करणे अत्यावश्यक आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जनगणना करायला शिक्षकांचे तीन दिवसांचे प्रशिक्षण सुरू आहे त्यासाठी मंडप, भोजन, साऊंड सिस्टिम,एलईडी आणि अन्य खर्चाचे वर्षभराचे टेंडर असते ते मंजूर केल्याशिवाय हा खर्च करता येणार नाही शिंदखेडात अनेक ठिकाणी पथदिवे नसल्याने रात्री अपरात्री नागरिकांची गैरसोय होते. चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे नवीन लाईट टाकण्याचे वार्षिक टेंडर मंजूर करणे आवश्यक आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार असून त्यापूर्वी शहराच्या विविध भागातील नाले, गटार साफसफाई करणे आवश्यक आहे. हे काम झाले नाही तर पावसाळ्यात गटारी आणि नाले तुंबून नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. पावसाळ्यामध्ये पाणीपुरवठा करताना टीसीएल पावडर तसेच इतर केमिकल वापरून पाणी शुद्धीकरण करणे आवश्यक आहे. त्याचे वार्षिक टेंडर असते. त्याची दर निश्चिती करणे आवश्यक आहे यांसारख्या 25 ते 30 विविध कामांसाठी वार्षिक निविदाची दर निश्चिती करणे गरजेचे आहे. अन्यथा दैनंदिन कामे ठप्प होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीच्या सदस्यांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. दर निश्चिती करणे हे नेहमीचेच काम असते. मात्र या सदस्यांना नेमके काय करायचे आहे? त्यांचा काय हेतू आहे? याबाबत माहिती नाही. शिंदखेडा नगरपंचायत स्थापन झाल्यापासून स्थायी समिती आणि विषय समित्यांची एकदा देखील मीटिंग, सभा झालेली नाही. माझ्यासोबतच्या सदस्यांनी ती सुरू केली आहे तरी देखील काही निमित्त करून स्थायी समितीची सभा तहकुब करणे,पुढे ढकलणे असे प्रकार सुरू आहेत. त्यांना नागरिकांच्या दैनंदिन अडचणीचे काय करायचे याबाबत निर्णय घेता येत नाही. मात्र या प्रकारांमध्ये गटातटाचे राजकारण न करता शिंदखेडा शहराच्या नागरिकांना सोयी सुविधा आपल्याला लवकरात लवकर कशा देता येतील यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. या पत्रकार परिषदेमधून मी हे आवाहन करीत आहे.आणि शिंदखेडा शहराच्या सुज्ञ नागरिकांना या गोष्टीची माहिती व्हावी हा माझा हेतू आहे.यावेळी पत्रकार परिषदेला नगरसेवक अर्जुन भिल, पुष्पाताई सोनवणे,प्रा. दीपक माळी, नगरसेवक प्रतिनिधी सुभाष माळी, अरुण देसले, राहुल पाटील, राहुल सोनवणे उपस्थित होते.


















