Homeताज्या बातम्यामानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म या भावनेतून संजीव गिरासे यांचे लेखन कार्य कुलगुरू...

मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म या भावनेतून संजीव गिरासे यांचे लेखन कार्य कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी .                               प्राचार्य. संजीव गिरासे यांचा बहिणाबाई चौधरी पुरस्काराने सन्मान

मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म या भावनेतून संजीव गिरासे यांचे लेखन कार्य
कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी .                               प्राचार्य. संजीव गिरासे यांचा बहिणाबाई चौधरी पुरस्काराने सन्मान.                                              ✍️ यादवराव सावंत शिंदखेडा माझा न्युज
धुळे : – साहित्य हे समाजाला दिशादर्शक असावे. बहिणाबाई चौधरी यांच्या कविता तत्कालीन समाजासह आजच्या आधुनिक समाजालाही दीपस्तंभ भासतात. त्यांच्या साहित्यातील ग्रामीण जीवन, निसर्ग आणि मानवी भाव- भावनांचा सुरेख संगम आढळतो. साहित्यिकाची हीच खरी ओळख असावी. मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म या शिकवणीतून आलेली सहिष्णुता व संवेदनशीलता याची प्रेरणा देणारे संजीव गिरासे यांचे साहित्य आहे, असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या वतीने साहित्य क्षेत्रातील मौलवीक योगदान देणाऱ्या साहित्यिकाला बहिणाबाई चौधरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. खानदेशातील सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्राचार्य डॉ. संजीव गिरासे यांना २०२५ चा बहिणाबाई चौधरी पुरस्कार देऊन समारंभ पूर्वक गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर सोपान इंगळे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र नन्नवरे, प्रोफेसर शिवाजीराव पाटील, अमोल पाटील, नितीन झाल्टे, प्रोफेसर योगेश पाटील, प्रोफेसर रवींद्र पाटील, प्रोफेसर महेंद्रसिंग रघुवंशी, प्रोफेसर पवित्रा पाटील, प्रोफेसर म. सु. पगारे विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रोफेसर जगदीश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या तसबिरीचे पूजन करून कार्य गौरव सोहळ्याचे सुरुवात झाली. बहिणाबाई चौधरी पुरस्कार वितरण सह विद्यापीठ आणि परिक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या प्राध्यापक संशोधक शिक्षकेतर कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचा देखील कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना प्राचार्य संजीव गिरासे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या वांग्मयीन वाटचालीवर चर्चा करीत आपणही बहिणाबाई चौधरी यांनी निर्माण केलेल्या वांग्मयीन पायवाटेवर चालण्याचा प्रयत्न करू असा शब्द उपस्थित त्यांना दिला त्याचबरोबर प्राध्यापक संजीव गिरासे यांनी तीन संस्थांमधून ज्ञानदानाचे कार्य केलेले आहे. त्यात स्वोध्दारक विद्यार्थी संस्था, दोंडाईचा, संस्थापक अध्यक्ष दादासाहेब रावल, किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर, संस्थापक अध्यक्ष कर्मवीर व्यंकटराव रणधीर आदिशक्ती धनदाई माता शिक्षण प्रसारक संस्था, म्हसदीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य आर. डी. देवरे यांच्या संस्कारात आपण घडलो म्हणून नम्रतापूर्वक संजीव गिरासे यांनी बहिणाबाई चौधरी पुरस्कार अर्पण केला. कुलगुरू प्रोफेसर विजय माहेश्वरी यांनी विद्यापीठ स्थापनेपासून तर आज पर्यंत चा विद्यापीठाचा शैक्षणिक अहवाल सादर केला हा अहवाल सादर करता म्हणाले, की विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवत्ता हे ध्येय कायमस्वरूपी बाळगलेले आहे आणि आज विद्यापीठ गुणवत्तेच्या आधारावर जगभर प्रसिद्धीला आलेले आहे. त्याचा परिपाक म्हणून आज आपल्या विद्यापीठात परदेशातील विद्यार्थी प्रवेश घेऊन अध्ययन करीत आहे. हा विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून मानाचा तुरा आहे अशी भावनाही कुलगुरू प्रोफेसर माहेश्वरी यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की विद्यापीठ आणि विद्यापीठ परिक्षेत्रात विविध महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर कर्मचारी कार्यरत असतात त्यांच्या कार्याला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे या दृष्टिकोनातून कार्य गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र कुलगुरू प्रोफेसर सोपान इंगळे यांनी केले तर आभार कुलसचिव प्रोफेसर विनोद पाटील यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गोरडे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776589654.5b96dfb9 Source link

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात...

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात डेरगं 👉 शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्त्याकडे दुर्लक्ष ✍️शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776571604.5ad283eb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776553532.5a78450a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776535290.5955085f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776589654.5b96dfb9 Source link

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात...

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात डेरगं 👉 शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्त्याकडे दुर्लक्ष ✍️शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776571604.5ad283eb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776553532.5a78450a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776535290.5955085f Source link
error: Content is protected !!