Homeताज्या बातम्या. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रिपाई एकतावादी, आर्यन्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे रक्तदान...

. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रिपाई एकतावादी, आर्यन्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे रक्तदान शिबिराला 60 रक्तदात्यांचा प्रतिसाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रिपाई एकतावादी, आर्यन्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे रक्तदान शिबिराला 60 रक्तदात्यांचा प्रतिसाद

✍️शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) :=

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी), आर्यन्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व आर्यन्स ग्रुप यांच्या संयुक्त विदयमाने शिंदखेडा येथील स्थानिक सार्वजनिक सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून एकूण 60 रक्तदात्यानी रक्तदान केले.
सदर शिबिराचे उद्घाटन शिंदखेडा लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती कलावती सुकलाल माळी यांच्या हस्ते झाले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरुवात केली. तसेच शिंदखेडा शहराचे पोलीस निरीक्षक डोके साहेब यांनीही बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
कार्यक्रमास प्रमुख अँड. अरविंदकुमार मंगासे, राहुल पाटोळे, दीपक दादा अहिरे, मनीष माळी, सीनियर सेक्शन इंजिनियर रमेश कुमार सिंह , अँड बापू आखाडे, रिटायर्ड स्टेशन मास्टर सी. बी. मंगासे, लालसिंग गिरासे आदी मान्यवर होते.
प्रत्येक रक्तदात्याला आयोजकांच्या वतीने २० लिटरचा पाण्याचा जार तसेच भारतीय संविधानाची उद्देशिका असलेली फ्रेम भेट म्हणून देण्यात आली. ही फ्रेम रक्तदात्यांसाठी प्रेरणादायी ठरली. तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्व नागरिकांना कोल्ड्रिंक्स व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
या रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळून एकूण 60 जणांनी रक्तदान केले. यामध्ये तरुण, महिला व वृद्धाचा समावेश होता.रक्तसंकलनासाठी धुळे चे नवजीवन ब्लडचे वैद्यकीय पथक उपस्थित होते.
युवा कार्यकर्त्यांचे यशस्वी आयोजन प्रविण भाऊ मंगासे, नवनीत नरभवर, राहुल गव्हाणे, राहुल मराठे, फिरोज शेख, विजय सावळे, गणेश सोनवणे, संतोष सावळे, पंकज फुले, प्रदीप पाटील, राजू बैसाणे, बापू नगराळे, हर्षदीप वेंदे, पराग सोनवणे, सतीश पवार, गोलू पवार, अजय साळुखे, आकाश आहिरे, चेतन आहिरे, देव मालचे, प्रशांत शिपी यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमामुळे शिंदखेडा शहरात सामाजिक एकतेचा संदेशही गेला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी) च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे हे आयोजन शिंदखेड्याच्या सामाजिक जीवनात एक आदर्श निर्माण करून गेले.तर डॉ. बाबासाहेबाना खरी आदरांजली ठरली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776353974.4fc7a769 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776335726.4e7cbcfb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776317628.4d31c337 Source link

बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी ✍️शिंदखेडा माझा (.संपादक...

बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी ✍️शिंदखेडा माझा (.संपादक यादवराव सावंत) :- शिंदखेडा तालुक्यातील...

बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी ✍️शिंदखेडा माझा (.संपादक ...

बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी ✍️शिंदखेडा माझा (.संपादक  यादवराव सावंत)        शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे विश्वरत्न...

error: Content is protected !!